Kusumagraj marathi kavita: गजानन रंगनाथ शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. आपण त्याला कुसुमाग्रज या नावानेही ओळखतो. त्यांचे जन्मस्थान पुणे होते. त्यांना विष्णू वामन शिरवाडकर या नावाने देखील ओळखले जात असे. प्रख्यात मराठी कवी, कादंबरीकार, लघुकथा लेखक, नाटककार आणि मानवतावादी. कवी कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य न्याय आणि समानतेवर आधारित अतिशय प्रसिद्ध कविता लिहिल्या. पाच दशकांच्या कालावधीत त्यांनी 16 कविता लिहिल्या तसेच तीन कादंब .्या त्यांनी प्रकाशित केल्या. याव्यतिरिक्त, लघुकथाचे आठ खंड, निबंधाचे सात खंड, 6 एकांकी नाटक आणि 18 नाटके देखील लिहिली गेली. कुसुमाग्रजमधील गाण्यांचा एक प्रसिद्ध संग्रह तयार केला ज्याला विशाखा देखील म्हणतात. त्यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकाची मराठी साहित्यात मोठी भूमिका आहे. त्यांचा जन्म पुणे, महाराष्ट्रात झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला आणि भारतीय साहित्यातील उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. आज आम्ही व्हीव्ही शिरवाडकर यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आपल्यासमोर सादर करणार आहोत जे आपण आपल्या मित्रांसह facebook आणि whatsapp वर शेअर करू शकता. तसेच, शाळेतील विद्यार्थी या कविता पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात आणि 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12 इयत्तेतील विद्यार्थीही या कवितांमधून बरेच काही शिकू शकतात .हं. पहा kusumagraj prem kavita, kusumagraj chya kavita, कुसुमाग्रज यांच्या गाजलेल्या कविता, कुसुमाग्रज यांच्या मराठी माहिती, कुसुमाग्रज बालकविता, कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता कणा मराठी कविता संग्रह PDF, गाभारा कविता, पुतळा कविता इत्यादी|

Kusumagraj Kavita in Marathi

कुसुमाग्रजांच्या निवडक कविता

भारतातील काव्यसंग्रह आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज पहा ज्यात त्याच्या प्रसिद्ध कवितांचा समावेश आहे. या कवितांमध्ये त्याच्या उत्कृष्ट कवितांचा समावेश आहे ज्या स्वातंत्र्य न्याय समानता आणि दडपशाहीपासून स्वातंत्र्य या विषयांवर आधारित आहेत. या कवितांसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी या कविता खूप महत्वाच्या मानल्या जातात. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या काही प्रसिद्ध काव्यसंग्रह पाहा. Marathi Prem Kavita देखील तपासा

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
कुसुमाग्रज

Kusumagraj short poems in marathi

शहाणपण

इथे वाटतं प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी हातून चुका
तरी करतात बहाणे

वाईट नसतं कोणालाही
मनापासून चाहणे
मात्र वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे

जरूरी असतं प्रत्यकाने
वकुब ओळखून राहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाह पतित वहाणे
__कुसुमाग्रज

Tujhya Yashacha Punav Kusumagraj Marathi Kavita

तुझ्या यशाचा हा पुनवचांद
अमृत देई आर्त जिवाला॥

प्रियजनांच्या सुखि रे आता
उरला मला विसावा
करिति आसवे हीच सुखाची
शीतल जीवन-ज्वाला॥

Kusumagraj Marathi Poems

प्रेम

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं

__कुसुमाग्रज

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
– कुसुमाग्रज

स्वप्नाची समाप्ति

स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा.
स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशांत
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरांत.
काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.
रातपाखरांचा आर्त
नाद नच कानीं पडे
संपवुनी भावगीत
झोंपलेले रातकिडे.
पहांटचे गार वारे
चोरट्यानें जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर.
शांति आणि विषण्णता
दाटलेली दिशांतुन
गजबज गर्जवील
जग घटकेनें दोन !
जमूं लागलेले दंव
गवताच्या पातीवर
भासतें भू तारकांच्या
आसवांनीं ओलसर.
काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्यांचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
प्राजक्ताच्या पावलाशीं
पडे दूर पुष्प-रास
वार्‍यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास.
ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधीं पूर्ती
वेड्यापरी पूजतों या
आम्ही भंगणार्‍या मूर्ती
खळ्यामध्यें बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यांतील घुंगरांचा
नाद कानीं येऊं लागे.
आकृतींना दूरच्या त्या
येऊं लागे रूप-रङ्ग
हालचाल कुजबूज
होऊं लागे जागोजाग.
काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.
होते म्हणूं स्वप्न एक
एक रात्र पाहिलेलें
होतें म्हणूं वेड एक
एक रात्र राहिलेले.
प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर.
ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडांत दिसूं वेडे
आणि ठरूं अपराधी.

कवी – कुसुमाग्रज

Kusumagraj kavita in marathi

दूर मनोर्‍यात

वादळला हा जीवनसागर – अवसेची रात
पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात
भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा
पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली
प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती
परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात
– विशाखा, कुसुमाग्रज

सागर – कुसुमाग्रज

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

कवी – कुसुमाग्रज

आगगाडी आणि जमीन / कुसुमाग्रज

नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून

धावसी मजेत
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले चुरून !

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितीक ढाळसी
वरून निखारे !

नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेभान होऊन !

ढगात धुराचा
फवारा सोडून
गर्जत गाडी ती
बोलली माजून –

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन !धावेन !

चला रे चक्रानो ,
फिरत गरारा
गर्जत पुकारा
आपुला दरारा !

शीळ अन कर्कश
गर्वात फुंकून
पोटात जळते
इंधन घालून

शिरली घाटात
अफाट वेगात
मैलाचे अंतर
घोटात गिळीत !

उद्दाम गाडीचे
ऐकून वचन
क्रोधात इकडे
थरारे जमीन

“दुर्बळ भेकड !
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी!

हवेत पेटला
सूडाचा घुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश !

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती !

कुसुमाग्रज कविता

क्रांतीचा जयजयकार – कुसुमाग्रज

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!
खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

कवी – कुसुमाग्रज

Hindi Version

क्रांति का जयजयकार / कुसुमाग्रज

गरजो जय-जयकार क्रान्ति का, गरजो जय-जयकार
और छाती पर झेलो वज्रों के प्रहार

खलखल करने दो शृंखलाएँ हाथों-पावों में
फ़ौलाद की क्या गिनती, मृत्यु के दरवाज़ों में
सर्पो! कस लो, कस लो, तुम्हारे भरसक पाश
टूटे प्रकोष्ठ, फिर भी टूटेगा नहीं कभी आवेश
तड़िघात से क्या टूटता है तारों का संभार?
कभी यह तारों का संभार? गरजो जय-जयकार

क्रुद्ध भूख भले मचाए पेट में तूफ़ान
कुतरने दो ताँतों को, करने रक्त का पान
संहारक कलि! तुझे बलि हैं देते आव्हान
बलशाली मरण से बलवान हमारा अभिमान
मृत्युंजय हम, हमें क्या हैं कारागार?
अजी, क्या हैं कारागार? गरजो जय-जयकार

क़दम क़दम पे फैल अंगारे अपने हाथों से
हो के बेख़ुद दौड़ते हैं हम अपने ध्येयपथ पे
रुके नहीं विश्रांति को, देखा नहीं कभी पीछे
बांध सके नहीं हमें प्रीति या कीर्ति के धागे
एक ही तारा सन्मुख और पाँव तले अँगार
हाँ था पाँव तले अँगार! गरजो जय-जयकार

हे साँसो! तुम जाओ वायु संग लांघ यह दीवार
कह दो माँ से हृदय में हैं जो जज़्बात
कहो कि पागल तेरे बच्चे इस अंधियारे से
बद्ध करों से करते हैं तुम्हें अंतिम प्रणिपात
मुक्ति की तेरी उन को थी दीवानगी अनिवार
उन को थी दीवानगी अनिवार, गरजो जय-जयकार

फहराते तेरे ध्वज बंध गए हाथ शृंखला में
यश के तेरे पवाड़े गाते आए फन्दे गले में
देते जो जीवन अर्घ्य तो कहलाए दीवाने
माँ दीवानों को दोगी न तेरी गोद का आधार?
माँ तेरी गोद का आधार? गरजो जय-जयकार

क्यों भिगोती हो आँखें, उज्ज्वल है तेरा भाल
रात्रि के गर्भ में नहीं क्या कल का उषःकाल?
चिता में जब जल जाएंगे कलेवर ये हमारे
ज्वालाओं से उपजेंगे नेता भावी क्रांति के
लोहदण्ड तेरे पावों टूटेंगे खन-खनकर
हाँ माँ! टूटेंगे खन-खनकर, गरजो जय-जयकार

ओंकार! अब करो ताण्डव लेने को ग्रास
नर्तन करते पहन लिए हैं गले में पाश
आने दो लूटने रक्त और माँस गिद्धों को क्रूर
देखो-देखो खुला कर दिया है हम ने अपना उर
शरीरों का इन करो अब तुम सुखेनैव संहार
मृत्यो! करो सुखेनैव संहार! गरजो जय-जयकार

गरजो जय-जयकार क्रान्ति का गरजो जय-जयकार

मूल मराठी से अनुवाद

रीढ़ / कुसुमाग्रज

“सर, मुझे पहचाना क्या?”
बारिश में कोई आ गया
कपड़े थे मुचड़े हुए और बाल सब भीगे हुए

पल को बैठा, फिर हँसा, और बोला ऊपर देखकर

“गंगा मैया आई थीं, मेहमान होकर
कुटिया में रह कर गईं!
माइके आई हुई लड़की की मानिन्द
चारों दीवारों पर नाची
खाली हाथ अब जाती कैसे?
खैर से, पत्नी बची है
दीवार चूरा हो गई, चूल्हा बुझा,
जो था, नहीं था, सब गया!

“’प्रसाद में पलकों के नीचे चार क़तरे रख गई है पानी के!
मेरी औरत और मैं, सर, लड़ रहे हैं
मिट्टी कीचड़ फेंक कर,
दीवार उठा कर आ रहा हूं!”

जेब की जानिब गया था हाथ, कि हँस कर उठा वो…

’न न’, न पैसे नहीं सर,
यूँ ही अकेला लग रहा था
घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी…
हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो… बस!”

मूल मराठी से अनुवाद : गुलज़ार

कुसुमाग्रजांच्या कविता

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!
***
कवी – कुसुमाग्रज

Kusumagraj poems in marathi

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका
***
कवी – कुसुमाग्रज

कुसुमाग्रज यांच्या कविता

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी
प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात
***

कवी – कुसुमाग्रज

Kusumagraj yanchi kavita

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन.
दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावली सारखी
निघुन जाईन.
तुझा मुगूट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही.
माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.
– कुसुमाग्रज

लिलाव

उभा दारी कर लावुनी कपाळा
दीन शेतकरी दावुनी उमाळा,
दूत दाराशी पुकारी लिलाव,
शब्द कसले ते-घणाचेच घाव !
पोसलेले प्राशून रक्त दाणे
उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे
निघत मागुनि वाजले आणि थाळि,
गाडग्यांची ये अखेरीस पाळी !
वस्तुवस्तूवर घालुनिया धाड
करित घटकेतच झोपडे उजाड
स्तब्ध बाजूला बसे घरधनीण
लाल डोळ्यातिल आटले उधाण
भुके अर्भक अन् कवळुनी उरास
पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास
ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी
‘आणि ही रे !’ पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार
कवी – कुसुमाग्रज

वादळवेडी – कुसुमाग्रज

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात…
कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात

कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात

तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हिच ठेविते फुटकळ मरणे किनखापी बटव्यात
कवी – कुसुमाग्रज

झाड

एकदा मध्यरात्रीच्या नीरवेतून मी ऐकला होता एक भयानक चीत्कार पलिकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुटमटातून उफ़ाळलेला. कोणत्या तरी पक्षाची प्राणान्तिक किंकाळी जी फ़ोडीत गेली दहा दिशांच्या तटस्थ तावदानी काचा, भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदामेंदा होऊन त्याच वृक्षाच्या फ़ांद्यांतून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये. नंतर त्या किंकाळीला फ़ुटत होते धुमारे चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे, रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अनकुचीदार झटके फ़ांद्यांतून फ़ुटणार्या अपस्मारांचे. सार्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात झाले होते जागे कोठल्या तरी दानवी अत्याचाराने, आणि झाले होते स्वतःच एक अगतिक वेदनेचे वारूळ पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले आणि शृतिहीन आकाशाला हाक मारणारे. देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये. आले असेल एखादे जहर काळे रानमांजर अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद डाळणारे एका फ़ांदीवरुन दुसर्या फ़ांदीवर ललसत्या नखाळ पंजांनी चडणारे. त्याने अचानक अखेरच्या तळावरुन घेतली असेल उशी टाकली असेल झेप उषःकालाचे राजवर्खी स्वप्न पाहणार्या एखाद्या निद्रिस्त गोजिरवाण्या पाखरावर. मृत्यूच्या करवती दातांत जागृत झालेल्या त्या पाखराने फ़ोडली असेल पहिली भीषण किंकाळी आणि तुकड्यातुकड्याने शरीर फ़ुटत असताना घातल्या असतील त्या व्याकूळ विझणार्या हाका भोवतालच्या विश्वाला. नसेल रानमांजर असेल कदाचित घुबडही असेल कदाचित एखादा अजगरी सर्प कृतान्ताचे विळखे घालीत बुंध्यावरुन सरकणारा, असेल काहीही; पक्षा-ऐवजी कुरतडली गेली असतील कदाचित त्याची पिलेही, पण एक खरे की त्या दहा मिनिटांच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचे एकही पान हालले नाही, काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे शांत्–शांत! दूर झालो मी खिडकीपासून पुन्हा मोठा केला रेडियोचा मंदावलेला गाज आणि शिलगावला मेजावरचा दिवा. कोठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरापी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर, आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली माहेरवासी अधीरतेने; सावल्यात साखळेल्या भिंती मुक्त झाल्या त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे आणि उभे केले माझ्या सभोवार एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन, आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला की मी पक्षी नाही
– कुसुमाग्रज

Kusumagraj Marathi Kavita – Poems in Marathi – कुसुमाग्रज कविता संग्रह
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

you can contact us on my email id: harshittandon15@gmail.com

Copyright © 2016 कैसेकरे.भारत. Bharat Swabhiman ka Sankalp!

To Top